देश
Union Budget 2024: 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, सर्वसामान्यांसाठी Income Tax सह मोठ्या घोषणांचा पाऊस?
nobanner
सर्वसामान्यांसह संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागलेला अर्थसंकल्प (Union Budget 2024) 23 जुलै रोजी मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 18 व्या लोकसभेचं (LokSabha) पहिलं सत्र संपलं आहे. यावेळी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला आणि लोकसभा व राज्यसभेची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी संबोधित केलं होतं. आता सर्वांचं लक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आहे.
Share this: