देश
नांदेड जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडूनच रेशन धान्य घोटाळा; साडेतीन वर्षांनी वेणीकर शरण
बहुचर्चित कृष्णूर धान्य घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी संतोष वेणीकर फरार होता. वेणीकरने तब्बल साडेतीन वर्षानंतर अखेर न्यायालयात शरणागती पत्करली आहे. वेणीकरच्या शरणागतीमुळे कृष्णूर धान्य घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे. संतोष वेणीकर नांदेडचा जिल्हा पुरवठा अधिकारी असताना १८ जुलै २०१८ मध्ये कृष्णूर येथे सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य घेऊन जाणारे १९ ट्रक पोलिसांनी पकडले होते. दरम्यान, न्यायालयाने २० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संतोष वेणीकर नांदेडचा जिल्हा पुरवठा अधिकारी असताना १८ जुलै २०१८ मध्ये कृष्णूर येथे सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य घेऊन जाणारे १९ ट्रक पोलिसांनी पकडले होते. तत्कालीन पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिना आणि सहायक पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांनी ही कारवाई केली होती. कृष्णूर घोटाळ्यात कारवाई होईल, या भितीने संतोष वेणीकर फरार होता. न्यायालयाने आरोपी संतोष वेणीकरला २० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संतोष वेणीकर नांदेडचा जिल्हा पुरवठा अधिकारी असताना १८ जुलै २०१८ मध्ये कृष्णूर येथे सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य घेऊन जाणारे १९ ट्रक पोलिसांनी पकडले होते कृष्णूर येथील इंडिया अँग्रो मेगा अनाज कंपनीसमोर हे सर्व ट्रक पकडण्यात आले. या ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे गहू, तांदूळ आदी धान्य होते. प्रारंभी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. परंतु प्रकरणाची व्याप्ती पाहता पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांच्याकडे दिला. नुरुल हसन यांनी या प्रकरणातील सर्व पुरावे जमा करुन तब्बल १९ जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.