nobanner
डॉक्टर.डी.वाय.पाटील कॉलेज परिसरात आग भीषण आग लागली आहे. कॉलेज परिसरातील बांधकाम सुरु असलेल्या, निर्माणाधीन इमारतीला आग लागली आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे इमारतीला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. थर्माकोलने पेट घेतल्याने आग आणखी भडकली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Share this: