देश
भारतीयाने प्रेयसीचा गिळा चिरला, मृतदेह पुढच्या सीटवर बसवून दुबईच्या रस्त्यावर फिरवत होता गाडी
- 55 Views
- March 16, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या एका भारतीयाने प्रेयसीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह गाडीत पुढच्या सीटवर बसवून ४५ मिनिटे तो कार दुबईच्या रस्त्यावर फिरवत होता. पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी म्हणूनही त्याने गाडी थांबवली होती.
रविवारी दुबईतील कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली. मृत तरुणी सुद्धा भारतीय आहे. तिचे बाहेर प्रेम प्रकरण सुरु असल्याचे समजल्यानंतर चिडलेल्या प्रियकराने गळा चिरुन तिची हत्या केली. त्यानंतर दीरा येथील अल मुरकाबत पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्याचे वृत्त गल्फ न्यूजने दिले आहे. मागच्यावर्षी जुलै महिन्यात ही घटना घडली होती.
“आरोपीला पोलीस ठाण्यात पाहून मला धक्का बसला, कारण त्याच्या कपडयाला रक्ताचे डाग लागले होते” असे पोलीस अधिकाऱ्याने रविवारी कोर्टात सांगितले. “त्याच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. प्रेयसीची मी हत्या केली आहे, असे त्याने मला सांगितले. तरुणीचा मृतदेह पुढच्या सीटवर होता. तिचा गळा चिरण्यात आला होता. मागच्या सीटवर रक्ताने माखलेला एक मोठा चाकू होता” असे अधिकाऱ्याने सांगितले.
“मृत तरुणीसोबत मागच्या पाच वर्षांपासून माझे प्रेमसंबंध होते. पण अलीकडेच ती माझी फसवणूक करत असल्याचे मला समजले” असे आरोपीने पोलिसांना सांगितले. मुलीच्या कुटुंबियांना आरोपीने एक ई-मेलही पाठवला होता. तुम्ही लवकर तोडगा काढला नाहीत तर, मुलीची हत्या करेन असे त्याने त्या ई-मेल मध्ये म्हटले होते. एका मॉलबाहेर त्यांनी कार पार्क केली होती. गाडीमध्येच दोघांचे जोरदार भांडण झाले. त्यानंतर तरुणाने तिची हत्या केली अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.