अपराध समाचार
दुर्दैवी ! काही तासात कुटुंबाने गमावली आपली दोन मुले
- 131 Views
- June 20, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
कांदिवली आणि बोरीवलीदरम्याने लोकलच्या समोर मारुन एका २२ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. त्यानंतर अवघ्या ७ तासांतच त्याच्या लहान भावाचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एका घरातील दोन सख्ख्या भावांनी काही तासांत मृत्यूला कवटाळले. कांदिवलीच्या पश्चिम भागातील गणेशनगर येथे राहणाऱ्या खान कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला. मुश्ताक अली शेख याने रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या केली. तर त्याचा ७ वर्षांचा लहान भाऊ अजमल मागच्या १० दिवसांपासून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होता. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अजमल या आपल्या लहान भावाचा झालेला मृत्यू मुश्ताकला सहन झाला नाही. त्यामुळे तो अंत्यविधीला उपस्थित नव्हता. बराच वेळ होऊनही मुश्ताक न दिसल्याने त्याच्या घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. रात्री ९.३० वाजता अचानक या दोघांच्या वडिलांना फोनवरुन मुश्ताकने केलेल्या घटनेबद्दल माहिती मिळाली. काही तासांपूर्वीच लहान मुलाचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर मोठ्या मुलाने केलेली आत्महत्या हे अतिशय धक्कादायक होते. या मुलांची आई लहान मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरली नसल्याने त्यांना मोठ्या मुलाने केलेल्या आत्महत्येबाबत माहिती देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.
मुश्ताक आपला लहान अजमलवर अतोनात प्रेम करत होता. त्यामुळे तो रुग्णालयात असतानाच त्याचे काही बरे वाईट झाले तर आपण जगू शकणार नाही असे आपल्या कुटुंबियांना म्हणत होता. मुश्ताक तिन भावांमध्ये सगळ्यात मोठा होता. मुश्ताकच्या मृत्यूची नोंद अपघाताने झाली अशी करण्यात आली असली तरीही तो अपघात होता की आत्महत्या याबाबत तपास सुरु असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.