अपराध समाचार
तब्बल 100 महिलांचं लैंगिक शोषण, ढोंगी बाबा अटकेत
- 500 Views
- May 24, 2016
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- 0 Comments
- Edit
उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे तब्बल 100 महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका ढोंगी बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. अपत्य प्राप्तीच्या नावाखाली निपुत्रिक महिलांवर बलात्कार करणाऱ्या ढोंगी बाबा राम शंकर तिवारी उर्फ परमानंद याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
अपत्य नसलेल्या अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून हा ढोंगी बाबा त्यांचं लैंगिक शोषण करीत होता. मागील काही दिवसांपूर्वी एका पीडित महिलेचा आणि आरोपी परमानंदचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याआधी याच्याबाबत अशी चर्चा सुरुच होती.
या ढोंगी बाबाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बाबा पीडित तरुणीला धमकी देत असल्याचं समोर आलं.
हा ढोंगी बाबा ज्या महिलांना अपत्य नव्हतं त्याना आपल्या जाळ्यात अलगद अडकवीत असे. त्यानंतर त्यांचे शारीरिक शोषण करीत असे. जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये पीडित महिला कान पकडून माफीही मागत आहे. पण, हा ढोंगी बाबा महिलेला धमकी देऊन लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करीत होता.
उत्तरप्रदेशमधील या रंगील्या बाबाविरोधात त्याचाच ड्रायव्हर सुशील कुमार अवस्थी याने काही दिवसांपूर्वी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत असा आरोप करण्यात आला होता की, बाबाच्या आश्रमात देह व्यापाराचाही धंदा चालतो. ज्यामध्ये आरोपी बाबाची पत्नी मधु तिवारी आणि त्याचा मुलहगा विजय तिवारी देखील सहभागी आहेत. तर दुसरीकडे एका युवकाचं म्हणणं आहे की, बाबा महिलांवर बलात्कार करुन त्याची अश्लील व्हिडिओ तयार करायचा आणि त्यातून महिलांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळायचा. सध्या पोलिसांनी या ढोंगी बाबाला अटक करुन याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.