अपराध समाचार
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या
- 146 Views
- September 12, 2017
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश शंकरराव कोपरवाड (वय २३) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. विद्यापीठ वसतिगृहात आत्महत्या होण्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. सलग दोन आत्महत्या झाल्यामुळे विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली आहे. गणेश कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्षात शिकत होता. वसतिगृह क्रमांक एकच्या खोली क्रमांक ९८ मध्ये गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केली. आत्महत्येनंतर त्याच्याजवळ सुसाईड नोट सापडली असल्याच बोललं जात आहे. मात्र, त्यामध्ये काय मजकूर आहे, हे समजू शकलेलं नाही. प्रेम प्रकरणातून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
यापूर्वी अमोल काकडे या विद्यार्थ्याने वसतिगृह क्रमांक १ मध्येच गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. परभणी जिल्ह्यातील परतूर येथून तो शिक्षणासाठी औरंगाबादेत आला होता. वसतिगृह क्रमांक १ मधील रूम नंबर ७६ मध्ये अमोलने आत्महत्या केली होती.