दुनिया
फिलिपिन्सच्या कॅसिनोमधील गोळीबारात ३४ जणांचा मृत्यू
- 154 Views
- June 02, 2017
- By admin
- in दुनिया, समाचार
- 0 Comments
- Edit
फिलिपिन्सची राजधानी मनिलामधील एका कॅसिनोमध्ये झालेल्या गोळीबारात ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. लूटमार करण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबार केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडली, अशा माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली.
मनिलामधील मनिला एंटरटेनमेंट कॉम्प्लेक्समध्ये गोळीबाराची घटना घडली. अज्ञाताने गोळीबार केल्यानंतर कॅसिनोमध्ये एकच गोंधळ झाला. यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला. यासोबतच संपूर्ण कॅसिनोमध्ये धूर पसरल्यानेदेखील अनेकांना जीव गमवावा लागल्याची माहिती कॉम्प्लेक्सच्या ऑपरेटरने दिली. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतल्याचे वृत्तदेखील काही संकेतस्थळांनी दिले आहे. मात्र फिलिपिन्स सरकारकडून याचा इन्कार करण्यात आला आहे.
‘अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर रिसॉर्ट्स वर्ल्ड मनिला बंद ठेवण्यात आले आहे,’ अशी माहिती कंपनीकडून ट्विटरवर देण्यात आली आहे. ‘सुरक्षेचा विचार करुन फिलिपिन्स पोलिसांना सहकार्य करत आहे. कॅसिनोतील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत,’ असेदेखील कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली असल्याची माहिती दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या एसआयटीईने दिली.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.