देश
स्वतः बनविलेल्या हेलिकॉप्टरला उडवण्याचा प्रयत्न रँचोच्या जीवावर बेतला
स्वतः बनविलेलेल्या हेलिकॉप्टर उडविण्याचे प्रयत्न यवतमाळच्या रँचोच्या जीवावर बेतले आहे. आकाशात घिरट्या घालण्यासाठी सज्ज झालेल्या हेलीकॉप्टरच्या पंख्याचा चाचणीवेळी मार बसल्याने हा रँचोचा अपघाती मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील फुलसावंगी गावात हेलीकॉप्टर अपघातात शेख इस्माईल शेख इब्राहिम या 24 वर्षीय या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
फुलसावंगी या लहानश्या गावातील शेख इस्माईलने लहानपणी खेळण्यातले हेलीकॉप्टर उडवित असताना आपणही एक दिवस स्वतः पायलट बनून स्वत:च्या हेलीकॉप्टरने जगाची सफर करण्याचे स्वप्न रंगविले होते. आकाशात भरारी घेण्याच्या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी मेक इन इंडियाअंतर्गत त्याने प्रयत्न सुरु केलेत.आठव्या वर्गापर्यंत शिक्षण घेतलेला इस्माईल हा वेल्डिंग आणि फेब्रिकेन पत्रकारागिर असल्याने तो घरच्या कारखान्यात अलमारी, कुलर अशी उपकरणे बनवायचा. तर त्याचा भाऊ वेल्डर आहे.
कुटुंबातील या व्यवसायातून वेळ काढून इस्माईल ने स्वतःच मॅनुफॅक्चर केलेल्या पार्टद्वारे हेलिकॉप्टर तयार करणे सुरू केले.घरीच स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर बनविण्यासाठी गेले अनेक दिवसांपासून खूप मेहनत घेत होता.आपण बनविलेले हेलिकॉप्टर हवेत घिरट्या घालू शकते असा विश्वास त्याला होता. 15 ऑगस्ट इस्माईल आपल्या ‘मुन्ना हेलीकॉप्टर’ च्या उडानाचे प्रात्यक्षिक सादर करणार होता. मात्र तत्पूर्वीची चाचणी घेण्यासाठी काल रात्रीच्या सुमारास त्याने हेलिकॉप्टर सुरू केले, जमिनीवर सुरू केलेले इंजिन 750 अम्पियरवर फिरत होते.
दरम्यान अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला, तुटलेला फॅन मुख्य फॅनला येऊन धडकला आणि तो फॅन इस्माईलच्या डोक्यात लागला. यात इस्माईल गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. स्वतः हेलीकॉप्टर निर्मिती करण्याच्या स्वप्नाला पूर्पंत्वास नेण्यासाठी इस्माईल ने आपल्या पंखाना बळ दिले होते, मात्र साकारलेल्या हेलीकॉप्टर च्या पंखांनी त्याची स्वप्नपूर्ती होण्यापूर्वीच त्याचा घात केला. या ध्येयवेड्या तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.