खेल
युवराज सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड भारतीय खेळाडूनेच मोडला, फक्त १२ चेंडूंत साकारल्या ५३ धावा
युवराज सिंगने २००७ साली झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये धडाकेबाज फटकेबाजी केली होती. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडला सलग सहा षटकार लगावले होते. या सामन्यात युवराज सिंगने १२ चेंडूंत अर्धशतक झळकावण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता. पण हा वर्ल्ड रेकॉर्ड हा फक्त एकाच चेंडूने मोडला गेला आहे. कारण भारताच्या खेळाडूने आता आठ षटकारांसह फक्त ११ चेंडूंत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.
युवराज सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड हा रेल्वेच्या आशुतोष शर्मा या खेळाडूने मोडला आला. सध्याच्या घडीला भारतामध्ये बीसीसीआयने आयोजित केलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत हा विक्रम झाल्याचे पाहायला मिळाले. आशुतोषने या सामन्यात १२ चेंडूंत १ चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर ५३ धावांची धमाकेदार खेळी साकारली. ही खेळी साकारताना आशुतोषने यावेळी फक्त ११ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. यापूर्वी युवराजचा वर्ल्ड रेकॉर्ड हा १२ चेंडूंत अर्धशतक झळकावण्याचा होता.
बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबच्या संघाने आंध्रविरुद्धच्या सामन्यात २० षटकांत २७५ धावा करून इतिहास रचला. आतापर्तंयच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या होती. पंजाबच्या संघाने यावेळी मुंबईच्या संघाचा विक्रम मोडीत काढला आणि या स्पर्धेत सर्वाधिक धावा करत इतिहास आपल्या नावे केला आहे. आतापर्यंत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मुंबई संघाच्या नावावर होता, त्यांनी २०१९ या वर्षात सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात २५८ धावा केल्या होत्या. या सामन्यात श्रेयस अय्यरने ५५ चेंडूत १४७ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवनेही ६३ धावा केल्या होत्या. पण हा विक्रम आता पंजाबने आपल्या नावावर केला आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.