अपराध समाचार
मुंबईत तीन वर्षांचा मुलगा गटारात पडला, शोध सुरु
- 92 Views
- July 11, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
घराबाहेरील उघड्या गटारात पडल्याने एक तीन वर्षाचा चिमुकला वाहून गेल्याची घटना गोरेगाव येथे घडली आहे. काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून बचाव पथक या चिमुकल्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला
गोरेगावच्या आंबेडकरनगर येथे ही घटना घडली असून काल येथे मुसळधार पाऊस सुरु होता. त्यातच या चिमुकल्याच्या घराबाहेरील गटार उघडे होते. त्यातून पावसाचे पाणी मोठ्या प्रवाहाने वाहत होते. दरम्यान, हा चिमुकला रात्रीच्या सुमारास खेळताना घराबाहेर आला यावेळी बाहेर काहीसा अंधार असल्याने तो चुकून या उघड्या गटारात पडला आणि त्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. घटनास्थळावरील बाजूच्या एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून त्याद्वारे या चिमुकल्याचा बचाव पथकामार्फत शोध घेण्यात येत आहे.