देश
मातोश्रीवर मोठ्या राजकीय हालचाली; शिवसेना-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये निर्णायक चर्चा
nobanner
मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. काहीवेळापूर्वीच शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते मातोश्रीवर दाखल झाले होते. तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हेदेखील मातोश्रीवर दाखल झाले आहेत. काहीवेळातच अजित पवार याठिकाणी येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मातोश्रीवर मोठ्या राजकीय हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे.
Share this: