देश
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत कालवश, पुण्यात अखेरचा श्वास
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती आणि माजी आमदार देवीसिंग शेखावत यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवीसिंग शेखावत हे अमरावतीचे पहिले महापौर आणि माजी आमदार होते. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. पुण्यातील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. अखेर आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी सहा वाजता पुण्यात अंत्यसंस्कार केले जातील.