देश
भाजपच्या दोन्ही हिंदू शेरणींचा पराभव, जनतेनं नाकारलं; हैदराबादमध्ये औवेसी, अमरावतीत वानखेडे विजयी
लोकसभा निवडणूक निकालात यंदा महाराष्ट्रात धक्कादायक कल पाहायला मिळाले. विविध संस्था व एक्झिट पोलच्या अंदाजांना खोटं ठरवत जनतेनं मनातील कौल मतातून दिल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रातील 45 जागांवर विजय मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे भाजपचे (bjp) दिग्गज नेते या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री कपिल पाटील, मंत्री भारती पवार यांसारखे दिग्गज नेते पराभवाच्या छायेत आहेत. तर, देशभक्त म्हणून ज्यांना भाजपने प्रमोट केलं, ते उज्जल निकमही पराभूत झाले आहेत. अमरावतीमध्ये भाजपने नवनीत राणा (Navneet rana) यांना उमेदवारी दिली होती. मात्र, राणा यांनाही पराभव पत्कारावा लागला. हिंदू शेरणी म्हणून राणांचा प्रचार झाला होता. तर, नवनीत राणा ज्यांच्या प्रचारासाठी हैदराबादला गेल्या, त्या माधवी लता यांचाही पराभव झाला आहे.