देश
कोल्हापुरात शालेय सहलीच्या बसवर दगडफेक, मुलांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्याने तणाव
nobanner
कोल्हापुरातील दसरा चौक येथे शाळेय सहलीच्या बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. बसमधील मुलांनी जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा दिल्याने जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बससह चारचाकी वाहनावर ही दगडफेक करण्यात आली असून दगडफेक झाल्यानंतर जमाव फरार झाला आहे. मुस्लिम बोर्डिंग समोर हा प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तर, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Share this: