देश
“उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरु”, एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया या सर्व राजकीय धामधुमीत खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, या चर्चेतून अद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही. त्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरल्याचं दिसत आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले. या सर्व राजकीय धामधुमीत खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.